सवाई गंधर्व महोत्सव : श्रवणीयतेकडून प्रेक्षणीयतेकडे?
सध्याच्या सवाईमध्ये तुफान गर्दी होते, वलय तयार झालं आहे. लाखो टाळ्यांचे सतत गजर होतात. परंतु हे सर्व श्रवणीयतेकडून प्रेक्षणीयतेकडे होताना दिसतं. गाणं पाहायला येणाऱ्या, फेस्टिव्हल म्हणून एन्जॉय करणाऱ्यांची संख्या वारेमाप झाली आहे. त्यामुळे साहजिकच गाणाऱ्याची वेशभूषा, तबलजीची केशभूषा हे चर्चेचे विषय ठरू लागले आहेत. काही अपवाद वगळता गायक-वादकही चमत्कृतीपूर्ण गायन, वादन करण्यात मग्न होत आहेत........